बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य महासत्ता होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया–अडव्होकेट सुभाष आचरेकर

भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. असे हे बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य भारत देश महासत्ता होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया.भारतीय संविधानाने घालून दिलेली मुल्ये आत्मसात करुन जतन करुया असे उद्गार धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे सचिव सुभाष आचरेकर यांनी न्यू इंग्लिश स्कूल येथे व्यक्त केले.
न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे प्रजासत्ताक दिना निमित्त सुभाष आचरेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक स्कूल समिती चे जे एम फर्नांडिस, अर्जुन बापर्डेकर, मॅनेजमेंट स्कूलचे संजय मिराशी, विद्यानंद परब,इंग्लिश मेडिअम स्कूलचे परेश सावंत, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी,मुख्याध्यापक अंकुशराव घुटुकडे,मायलिन फर्नांडिस,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी मुजावर यांसह अन्य शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना कापिमुक्त परीक्षा, कुष्ठरोग निर्मूलन बाबत शपथ घेण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांनी केलेल्या कवायतीनि वातावरण देशभक्ती मय बनले होते.

error: Content is protected !!