हैदराबाद येथे झालेल्या पोलीस बँड पथक स्पर्धेत स्वस्तिक सावंत यांना सुवर्ण पदक

स्वस्तिक सावंत हे आहेत कलमठचे सुपुत्र

या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा प्रथम क्रमांक

हैद्राबाद मौला अली आरपीएफ कॅम्प येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत महाराष्ट्र संघाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या पोलीस बँड पथक स्पर्धेत सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस हवालदार स्वस्तिक सुनील सावंत (कणकवली कलमठ )यांना या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. स्वस्तिक सावंत यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. प्रजासत्ताक दिनी त्यांच्यावर या निमित्ताने कौतुकाचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग पोलीस दलाची तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची देखील मान महाराष्ट्रात उंचावली आहे.

error: Content is protected !!