कणकवली शहरात पटवर्धन चौकातील गुटखा विक्रेत्यावर धाड

कणकवली शहरातील गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले
घटनास्थळी कणकवली पोलीस दाखल
कणकवली शहरात पटवर्धन चौकात एका स्टॉलमध्ये गुटखा विक्री प्रकरणी आज अचानक पोलिसांनी सायंकाळी छापा मारत गुटखा हस्तगत केला. या कारवाईने कणकवली शहरातील गुटखा व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कणकवली पोलीस या गुटखा कारवाईच्या ठिकाणी उपस्थित आहेत. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कणकवली पोलिसांच्या या कारवाईने कणकवली शहरातील अवैध व्यवसायिकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
दिगंबर वालावलकर /कणकवली





