महावितरणच्या विरोधात धीरज मेस्त्रींचे उपोषण

युवासेना जिल्हाप्रमुख कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह अनेकांनी भेट देत दिला पाठिंबा
कलमठ-सुतारवाडीतील पिंपळपार परिसरात उभारलेल्या सभामंडळावरून महावितरणची उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. या वाहिनाचा स्पर्श होऊन याठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. महावितरणच्या असंवेदशीलपणाच्या निषेधार्थ कलमठ ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांनी उपोषण सुरू केले आहे.
महावितरणचे अधिकारी, प्रांताधिकारी यांचे ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी लक्ष वेधले होते. मात्र, विद्युत वाहिनीच्या सुरक्षितेच्यादृष्टीने महावितरणने कोणताही उपाययोजना केल्या नाहीत. महावितरणच्या असंवेदशीलपणाच्या निषेधार्थ धीरज मेस्त्री यांनी उपोषण सुरू केले आहे.
कलमठ सुतारवाडी पिंपळपार येथील सभामंडपावरून जाणाऱ्या धोकादायक उच्चदाब विद्युतभरीत वाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत महावितरणकडे वारंवार निवेदन, पत्रव्यवहार, स्थळ पाहणी व कायदेशीर नोटीस देऊनही महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उपाययोजना करण्याकडे अक्ष्यम दुर्लक्ष केले आहे. महावितरण नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. तसेच ठेकेदार विकासाच्याविरोधात मेस्त्री हे उपोषणाला बसले आहेत. मेस्त्री यांच्या उपोषणाला स्थानिकांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख व कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, विनायक (बाळू) मेस्त्री, आबा मेस्त्री, प्रविण कोरगावकर, प्रकाश कोरगावकर, भूषण ठाकूर, प्रसाद मुसळे, बाळकृष्ण मेस्त्री, हर्षल मेस्त्री
किरण हुन्नरे,सूर्यकांता हुन्नरे, राजू कोरगावकर, दीपक मेस्त्री, विलास गुडेकर, वैदेही गुडेकर, जितू कांबळे हेलन कांबळे, निश्चय हुन्नरे, सिद्धेश हुन्नरे, राहुल कडुलकर, मंथन हजारे यांनी उपस्थित राहत उपोषणाला पाठिंबा दिला.





