तिवरेतील उपोषण अखेर एक महिन्याच्या कालावधी करिता स्थगित

एक महिन्यामध्ये कार्यवाही करण्या बाबत ग्रामपंचायत चे उपोषणकर्त्यांना आश्वासन
उपोषणस्थळी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली भेट
तिवरे गावातील भूमापन क्रमांक व उपविभाग ६७६ मधूल “जल जीवन मिशन” अंतर्गत तिवरे गावच्या नळयोजनेच्या विहिरीसाठी थ्री फेज विद्युत लाईन नेण्यात आल्याप्रकरणी तेथील जमीन मालक विश्राम म्हाडेश्वर व वैभव म्हाडेश्वर यांनी आज सुरू केलेले उपोषण अखेर दुपारनंतर स्थगित केले. ग्रामपंचायत ने याबाबत श्री म्हाडेश्वर यांना पत्रव्यवहार करत सदर पोल बाबत गटविकास अधिकारी स्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे., त्यानंतर संबंधित विभागांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली 27 फेब्रुवारी पर्यंत सदर लाईन अन्यत्र वळती करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. असे पत्र सरपंच तीवरे यांनी उपोषण कर्त्याना दिले. तसेच याबाबत कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी श्री म्हाडेश्वर यांच्या सोबतच कार्यकारी अभियंता यांच्यासोबत चर्चा करत तात्काळ या प्रश्नावर कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानंतर सरपंच, उपसरपंच यांच्यासहित माजी सरपंच भाई आंबेलकर व अन्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे उपोषण 27 फेब्रुवारी पर्यंत स्थगित करण्यात आले. तसेच दिलेल्या कालावधीत सदर काम मार्गी न लागल्यास 28 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण छेडले जाईल असा इशारा देखील श्री महाडेश्वर यांनी दिला आहे.





