उबाठा सेनेच्या वानिवडे येथील सदस्या मेघा सरवणकर यांचा भाजपामध्ये प्रवेश

ग्रा. प. निवडणुकी पाठोपाठ पुन्हा ठाकरे गटाला धक्का

भाजपाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवले या पाठोपाठ वानिवडे ग्रामपंचायत वॉर्ड न.३ मधील शिवसेना उबाठा सदस्या मेघा मंगेश सरवणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे यामुळे देवगड तालुक्यामध्ये उबाठा सेने ला चांगलाच दणका बसला आहे. या निवडणुकीत भाजपाने उबाठा ला पूर्ण धोबीपछाड दिली असतानाच हे सदस्य गेल्याने उबाठा सेना धक्का मानला जात आहे

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याने आपण हा प्रवेश घेतला असल्याचे सांगितले माझ्या भागाच्या तसेच ग्रामपंचायतच्या विकासासाठी आमदार नितेश राणे हेच योग्य नेतृत्व आहे असे त्यांनी सांगितले
यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, माजी नगराध्यक्ष प्रियांका साळस्कर, व्ही.सी खडपकर, रमेश सरवणकर व अन्य उपस्थित होते.

देवगड प्रतिनिधी

error: Content is protected !!