बिनविरोधच्या धक्क्यापाठोपाठ भाजपा प्रवेशाचा राणेंकडून सपाटा

ठाकरे सेनेचे वागदे ग्रामपंचायत सदस्य दशरथ गावडे यांच्या सहित पदाधिकारी भाजपामध्ये

एकीकडे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडीचा पालकमंत्री नितेश राणेंच्या पॅटर्न मधून महायुतीचा धडाका सुरू असतानाच पालकमंत्री नितेश राणे यांनी दुसरीकडे कणकवली मतदार संघात ठाकरे शिवसेनेला भागदाड पाडण्याचे काम सुरूच ठेवले आहे. वैभववाडी पाठोपाठ आज कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामपंचायतचे ठाकरे गटाचे सदस्य दशरथ गावडे, माजी शाखा प्रमुख रवी गावडे, संतोष घाडीगावकर, मनोज गावडे, शांताराम गावडे, अनंत गावडे, राजू गावडे आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर, समीर प्रभूगावकर, गोविंद घाडीगावकर, भाई काणेकर आधी उपस्थित होते.

error: Content is protected !!