शेवगा पिकाचे पेटंट मिळवणारे उत्तम फोंडेकर यांना गोपुरी कृषी सन्मान पुरस्कार जाहीर

26 जानेवारी रोजी रान माणूस प्रसाद गावडे यांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान

  यावर्षीचा 'गोपुरी कृषी सन्मान पुरस्कार' शेवगा पिकाचे पेटंट मिळवणारे कुंभारमाठ मालवण येथील उत्तम फोंडेकर यांना जाहीर झाला आहे. भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी उद्या २६ जानेवारी रोजी 'रान माणूस' प्रसाद गावडे यांच्या हस्ते गोपुरी आश्रमात सकाळी ९.०० वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी पोस्टडॉक्टरल पदवी मिळवणारे  श्री प्रथमेश नाडकर्णी यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सिंधुदुर्ग वासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन गोपुरी आश्रम परिवारातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!