हुबरट – साकेडी रस्त्याच्या दुतर्फा ची झाडी तोडण्याचे काम सुरू

तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू सदवडेकर यांचा पुढाकार
ग्रामस्थांमधून व्यक्त केले जातेय समाधान
हुबरट – साकेडी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत कापण्याबाबत ग्रामस्थांतून गेले अनेक दिवस वारंवार मागणी केली जात होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर साकेडी मधील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व सोसायटीचे संचालक राजू सदवडेकर यांनी या कामी पुढाकार घेत बांधकाम विभागाच्या उपभियंत्यांचे लक्ष वेधले होते. काही ठिकाणी या झाडी व गवता मुळे अपघात घडण्याची भीती होती. दोनच दिवसापूर्वी या प्रश्नी शाखा अभियंता गणेश कडुलकर यांनी या बाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.आज सोमवारी सकाळ पासून हे काम सुरू करण्यात आले असून, त्याची कार्यवाही श्री. सदवडेकर व ग्रा प सदस्य महंमद जऊर शेख यांनी करून घेण्यास सुरुवात केली. रस्त्यावरील वाहतुकीला धोकादायक बनलेल्या रस्त्याच्या बाजूची झाडी व गवत ग्रास कटर द्वारे कापून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. श्री. सदवडेकर यांनी पुढाकार घेतलेल्या या कामामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू सदवडेकर, माजी उपसरपंच ग्रा प सदस्य महंमद जऊर शेख, ग्रा प सदस्य दिगंबर वालावलकर, मोसीन शेख, फिरोज शेख, अब्दुल्ला शेख आदी उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी