कणकवली तालुक्यात पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपची मुसंडी

हळवल, वारगाव पोट निवडणुकीत भाजपा विजयी
दोन्ही ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला धक्का
कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकी करता झालेल्या मतदानामध्ये हळवलमधून प्रभाकर श्रीधर राणे 236 मते मिळवत विजय ठरले. त्यांच्या विरुद्ध असलेले सुभाष भिवा राणे यांना 167 मते मिळाली तर नोटा ला 3 मते मिळाली. तर वारगाव च्या पोटनिवडणुकीत प्रमोद आत्माराम केसरकर यांना 203 व महेंद्र आत्माराम केसरकर यांना 120 मते मिळाली यामध्ये प्रमोद केसरकर हे 203 मते मिळवत विजयी ठरले. तर नोटाला 4 मते मिळाली. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार गौरी कट्टे यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात मतमोजणीला सुरू झाली असून ओटव ग्रामपंचायतची मतमोजणी आता सुरू करण्यात आली आहे.
दिगंबर वालावलकर, कणकवली