ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल च्या मुलांची चमकदार कामगिरी.

कणकवली/मयुर ठाकूर.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय पोल आणि रोप मल्लखांब स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या मुलांची चमकदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
या स्पर्धेत 14 वर्षा खालील मुलींच्या गटात कु.शिफा बुलंद पटेल हिने दुसरा क्रमांक तर कु.सिद्धी प्रसाद हिने चौथा क्रमांक पटकावला.17 वर्षांखालील मुलींच्या गटात कु.प्रचिती घाडीगांवकर हिने दुसरा क्रमांक पटकावला. 14 वर्षांखालील मुलांमध्ये कु.किशन देसाई याने दुसरा क्रमांक कु.गणेश वाटोडे याने तिसरा क्रमांक तर कु.शुभम तांबे याने चौथा क्रमांक पटकावला .तर 17 वर्षांखालील मुलांच्या गटात कु.कुणाल परब प्रथम व कु.शुभम मलबा दि याने चौथा क्रमांक पटकावला.तर जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुश्रुत मंदार नानल याने 14 वर्षाखालिल् वयोगटात दुसरा क्रमांक पटकवला.प्रज्योत जोईल याने तिरंदाजी मध्ये जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवलाय.तर साहिल शेख याने 19 वर्षाखालील गटात मुलांमध्ये वेटलिफ्टिंग मध्ये पहिला क्रमांक मिळवलाय. सर्व विजेत्यांची विभागस्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल सर्व विजेत्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत ,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर ,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री.डी.पी.तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.