कामगार कल्याण केंद्र भजन स्पर्धेत कणकवली नवदुर्गा भजन मंडळ तृतीय

चिपळूण येथे आयोजित कामगार कल्याण भजन स्पर्धेत कणकवली येथील श्री नवदुर्गा भजनमंडळाने तृतीय
क्रमांक प्राप्त करत चिपळूण मध्ये ही आपल्या कलेची मोहोर उमटवली आहे.
श्री नवदुर्गा भजन मंडळ या मंडळाने या अगोदरही अनेक स्पर्धा मध्ये यशस्वी होत राज्य स्तरापर्यंत आपल्या भजन कलेची छाप उमटवली होती.
राज्य स्तरावर हे भजन पैठणला गेलं होतं.
2008 मधे “ई टीव्ही भजन स्पर्धेतही या मंडळाने भजन सादर केले होते. पंढरपूर.रत्नागिरी. मुंबई. कोल्हापूर नवरात्र सेवा. सांगली. देवगड सज्जनगड. गोंदवले. चाफळ. सातारा. कुडाळेश्वर मंदिरात दोनदा एक नंबर. मिळविला होता.कामगार कल्याण केंद्रातही त्यांनी अनेकदा सहभाग. घेतला होता. सावंतवाडी. शिवडाव मठ ते काणकोण _ पैंगीण पर्यंत त्यांचा भजन प्रवास झाला आहे. आजवर 2000 च्या वर कार्यक्रम करत आपल
भजन सेवा केली आहे.गायिका सुप्रिया प्रभू मिराशी यांनी नाविण्याचा ध्यास घेत भजन
कलेत विविध प्रकार सादर करत भजन कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. यात सोंगि भजन तसेच डोहाळे जेवण आदि कार्यक्रमातहि त्या आपली कला सादर करत असतात.त्यांच्या मंडळात
गीतांजली कामत. पूजा कामत. क्षमा कामत. तनुजा चव्हाण. वैजयंती मुसळे. श्वेता घाणेकर. उज्ज्वला गुरसाळे. सुमन सपकाळ. भाग्यश्री गावकर. संजना साटम. जयश्री पाटील. योगिता रासम. प्रेरणा लोद आदि सहभागी झाल्या असून
तबला साथ_ श्री. नंदन राणे.हे करत आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!