आबा रेडकर यांचे निधन

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेचे माजी कार्यकारिणी सदस्य व आचरा देवूळवाडीचे रहिवासी. वामन पांडुरंग तथा आबा रेडकर वय80 यांचे मुंबई बोरिवली येथील निवासस्थानी आकस्मिक दुःखद निधन झाले. सन २०१०-२०२३ या कालावधीत त्यांनी संस्थेच्या कार्यकारिणीवर कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले होते.संस्थेप्रती आदर,वेळेबाबत काटेकोरपणा तसेच स्पष्टवक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. साईसेवा मौडळाचेहि ते जेष्ठ मार्ग दर्शक होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेली २ वर्ष ते मुंबईत राहत होते.त्यांच्या पश्चात पुतणे सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, आचरा