मालवण ग्रामीण रुग्णालयात सिटीस्कॅन आणि एम आर ए ,सोनोग्राफी मशीन याची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये सि टी स्कॅन , एम आर ए आणि सोनोग्राफी मशीन ही उपकरणे त्वरित शासनाने आणि आरोग्यमंत्र्यांनी उपलब्ध करावे अशी मागणी तारकर्ली चे सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबई सचिव सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्याच्या आरोग्य मंत्री , मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्याजवळ मागणी केलेली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुरेश बापर्डेकर म्हणाले की,एखादा खेडेगावातील ,शहरातील आजारी गरीब नागरिक त्याची परिस्थिती अत्यंत बिकट असेल आणि त्याला खाजगी रुग्णालयात असो अगर सरकारी रुग्णालय असो तो अती गंबिर आजारी असताना उपचार करत असते वेळी डॉक्टर म्हणाले की यांचा एम आर ए करावं लागणार किंव्हा सिटी स्कॅन किंव्हा सोनोग्राफी त्वरित करावं लागेल याला पर्याय म्हणजे कुडाळ अगर कणकवली येथे जाणे आहे.अशावेळी मग पेशंटचे नातेवाईक मालवण हून कुडाळ अगर कणकवली येथे घेऊन जायचं पर्याय नाही.मग पेशंटला टेन्शन येतच त्यापेक्षा पेशंटचे नातेवाईक हडबडल्या स्थितीत असतात.याचे कारण मालवण कुडाळ प्रवास खर्च आणि सी टी स्कॅन अगर एम आर ए,सोनोग्राफी काढण्यासाठी प्रवास खर्च आणि इतर येणारा खर्च हा हजारो रुपये होतो त्यामध्ये पेशंटला नाहक प्रवासाचा त्रास आणि त्याततो पेशंटला टेन्शन देऊन जात .त्यात करून एवढं खर्च करूनही कित्येक वेळा आपले आई ,वडील ,भाऊ ,बहिण अन्य यांना कुडाळ,कणकवली येथे नेतेवेळी अगर घेऊन येते वेळी त्याच रस्त्यात बर वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असेल मग डॉकटर पासून सर्वच आपले हात वर करणार.
तसेच याच मालवण तालुक्यातील मालवण शहरात ग्रामीण रुग्णालयात एक्सरे काढला की तो साधा पेपर वर दीला जातो.तर तो पेपर साधा असल्याने रुग्णालयात चेकप अगर अन्य गोष्टी चेक करायल आल्यावर कोणताही एक्सरे काढल्यावर त्यावर फोटो कॉपी त्यावेळी सुस्पस्ट दिसत असल्याने शेवटी पांढरा पेपर असतो.परंतु जर एक्सरेला लागणारे साहित्य पुरवीत नाही तेथील ऑपरेटर अधिकारी काय करणार यासर्व गोष्टीची कमतरता नागरिक रुग्णांना भासत आहे.जर हे ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव भासत असेल तर मुख्य रुग्णालय ओरस हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रुग्णालय आहे त्याठिकाणी सर्व उपकरणासह त्याला लागणारे ऑपरेटर अधिकारी डॉकटर उपलब्ध करून चालू करावे जेणे करून नागरिक यांची कोणतीही यापुढे ऑपरेटर अधिकारी नाहीत मशीन बंद आहेत ही कारणे पुढे नसावीत .”
मालवण (प्रतिनिधी)