मुंबई – गोवा महामार्गावर पीठढवळ पुलावर बोलेरो पिकअप गाडीला अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे पीठढवळ पुलावर मासे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीला अपघात होऊन पलटी झाली आहे. हा अपघात सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास झाला.
MH. 08.AP.3821.ही गाडी रत्नागिरी वरून गोव्याच्या दिशेने जातं होती. मात्र गाडी चालकाला पिठढवळ पुलावरील वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. चालकाने आपल्या ताब्यातील गाडी कंट्रोल करून चार टू व्हिलरवाल्यांचे प्राण वाचविले. चालकाला थोडा मार लागला आहे आणि किरकोळ जखमी झाला आहे. या महामार्गावर अपघात झाल्याचे समजताच पत्रकार समिल जळवी,आमदार निलेश राणे यांचे स्वीय सहाय्यक निखिल कांदळगावकर आणि ग्रामस्थानी मदती साठी धाव घेतली.

error: Content is protected !!