विजयदुर्ग आगारामध्ये कामगार सेनेची मुसंडी

अनेक एसटी कर्मचाऱ्यांचा कामगार सेनेमध्ये प्रवेश

एसटी कामगार सेनेची कार्यकारणी जाहीर

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांची उपस्थिती

विजयदुर्ग एसटी आगारातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी विजयदुर्ग आगारा ची एसटी कामगार सेनेची कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली. युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी श्री. नाईक यांनी प्रवेशकर्त्याचे स्वागत केले. तसेच यावेळी एसटी कामगार सेनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. एसटी कामगार सेना तालुका अध्यक्षपदी सचिन खडपे, विजयदुर्ग आगार अध्यक्षपदी जितू तेली, सचिव राम एडके, उपाध्यक्ष रवी राणे, खजिनदार प्रवीण तीर्लोटकर, कार्याध्यक्ष निखिल निकम, विभागीय सदस्य एम बी पवार, एम बी राठोड, डी एम भेर्ले, विभाग प्रमुख संदीप डोलकर, शाखाप्रमुख संतोष मनचेकर, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश डोंगरे, गोविंद धुरी, कालिदास कुबल, स्टीफन फर्नांडिस आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!