आमदार नितेश राणे यांनी सुरू केलेली “मोदी एक्सप्रेस” गणेश भक्त चाकरमन्यांना घेऊन रवाना

आमदार नितेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा
मुंबईतून चाकरमान्यांना सिंधुदुर्गात गावी आणण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी सुरू केलेली “मोदी एक्सप्रेस” आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून रवाना झाली. आमदार नितेश राणे यांचा हा सलग अकरा वर्षीचा हा उपक्रम आहे.गेली अकरा वर्ष सातत्याने आमदार नितेश राणे रेल्वेच्या माध्यमातून चाकरमानी गणेश भक्तांना गावी गणेश चतुर्थीसाठी आणत असतात. वर्षी 1800 गणेश भक्तांना मोदी एक्सप्रेस मधून सिंधुदुर्गात रवाना करण्यात आले.
आमदार नितेश राणे यांनी मुंबईत दादर येथे रेल्वे स्थानकात जात प्रत्येक गणेश भक्ताची भेट घेतली. त्यांची चौकशी केली. यावेळी रेल्वेत खाण्या जेवणाची सर्व व्यवस्था आमदार नितेश राणे यांनी केलेली होती.त्या व्यवस्थेची सुद्धा पाहणी केली.एकंदरीत या उपक्रमाचे गणेश भक्तांनी कौतुक केले. आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.
कणकवली प्रतिनिधी





