जिल्हयात ११२ प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

महाराष्ट्रात १४ हजार ४२९ प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण
जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी पाहिले कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
प्रतिनिधी । कुडाळ : शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा पुरवणारी प्रधानमंत्री किसान समृद्धीची ११२ केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीन गुरुवारी उद्घाटन केलेल्या या सोहळ्याचे जिल्ह्यातले सुमारे ५ हजार शेतकरी प्रत्यक्ष साक्षिदार ठरले. या केंद्राचा जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असा आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केल आहे.
पीएम किसान लाभार्थ्यांना १४ व्या हप्त्याच वितरण सुद्धा यावेळी करण्यात आलं या कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुका पातळीवर १५ आणि ग्रामीण भागात ९७ अशी एकूण ११२ केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्रामुळे शेतकऱ्यांची धावपळ थांबणार आहे. फसवणूक थांबणार आहे. सर्व सुविधा एकत्र मिळणार असून कृषी मंत्रालय आणि खत मंत्रालयाला सूचना सुद्धा करता येणार आहेत.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघात करण्यात आल. या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश आणि सिंधुदुर्ग बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संध्या तेरसे, प्रदेश निमंत्रित अनिल उर्फ बंड्या सावंत , ज्येष्ठ नेते आणि माजी उप सभापती राजू राऊळ, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई , कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, कुडाळ नगर पंचायत विरोधी पक्ष गट नेते विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, भारतीय जनता युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष पप्या तवटे, रुपेश कानडे, तसेच जिल्हा कृषी अधिकारी विजय राऊत, तालुका कृषी अधिकारी घाटकर, अमोल करंदीकर, आर एस चव्हाण, पंचायत समितीचे प्रफुल्ल वालावलकर तसेच इतर अधिकारी, शेतकरी, कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक निलेश तेंडुलकर, व्यवस्थापक नंदकिशोर करावडे, खत विभाग प्रमुख सतीश आंबडोस्कर, लिपिक क्रांती मेस्त्री आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आर.सी.एफ. चे अधिकारी वराडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केले.
जिल्ह्यात १५६ पैकी ११२ केंद्रांवर भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारान कार्यक्रम संपन्न झाला ५ हजारहुन अधिक शेतकरी बंधूनी या केंद्रांना भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांना केलेले संबोधन ऐकले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.