ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे मध्ये “कारगिल विजय दिवस” साजरा

कणकवली/मयुर ठाकूर

  ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे  मध्ये "कारगिल विजय दिवस" दिमाखात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सर्व प्रथम कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करून सलामी देण्यात आली आपल्या प्राणाची बाजी देशासाठी बलिदान करणाऱ्या शूर सैनिकांची महती प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सांगितली यानंतर देशभक्तीपर गीत सादर झाले .निवृत्त भूदल अधिकारी श्री.यशवंत सदडेकर यांनी या कार्यक्रमात देश सीमेवरील आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले .

या कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई ,निवृत्त भूदल अधिकारी श्री.यशवंत सदडेकर,मार्शल आर्ट फोर्सचे प्रमुख श्री.पाटील उपस्थित होते.

error: Content is protected !!