डोंगर खचण्याकडे वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

सरंबळ, नेरूर ग्रामस्थ आणि भाजप शिष्टमंडळाने घेतली भेट
जिल्हाधिकारी, बांधकाम अधिकारी याना दिले निवेदन
पालकमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहि करण्याचे आदेश
प्रतिनिधी । कुडाळ : सरंबळ – देऊळवाडी आणि नेरूर – कांडरीवाडी व कुडाळ नेरुर वालावल चेंदवण कवठी रस्त्यावरील नेरुर कन्याशाळा येथील मोरी नुतनीकरण करण्यात यावी अशी मागणी भाजप शिष्टमंडळकने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळासह सरंबळ व नेरूर ग्रामस्थांनी बुधवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट घेतली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभागाला देखील देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्री आवटी यांची माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी नेरूर आणि सरंबळचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरंबळ देऊळवाडी तसेच नेरूर कांडरीवाडी येथील कोसळलेला डोंगर व कुडाळ नेरुर वालावल चेंदवण कवठी रस्त्यावरील नेरुर कन्याशाळा येथील मोरी नुतनीकरण करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे विनंती केली. पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागास तातडीने कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, सौ. संध्या तेर्से, बंड्या सावंत, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, रुपेश कानडे, पप्पू तवटे, सरंबळ सरपंच रावजी कदम, उपसरपंच सागर परब, अमोल कदम, माजी सरपंच अजय कदम, सुशिल कदम, बाळाजी कदम, श्रावण जाधव, ग्रामपंचायत सदस्य महेश सरंबळकर बंटी गोसावी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरंबळ देऊळवाडी येथील खचलेल्या डोंगराचा भराव रस्त्यावर आलेला आहे तो तातडीने जेसीबी लावून मोकळा करून त्या ठिकाणी गटार मारण्याचे काम आज सकाळी सुरू होणार आहे. तसेच यावर्षीच्या नियोजन समितीच्या आराखड्यांमधून त्या ठिकाणी संरक्षक भिंतीच्या कामाला मान्यता देऊन काम सुरू करण्याचे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.