शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी उत्तम तंत्रस्नेही बनावे-अमित मांजरेकर

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ ला संगणक प्रदान
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ येथे नुकताच संगणक प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.
सध्याचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या संगणकज्ञान आत्मसात करावे व जीवनात यशस्वी व्हावे .असे मनोगत श्री.अमित मांजरेकर(माजी सरपंच) यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी नडगिवे सरपंच माधवी मण्यार ,अनिकेत जामसंडेकर,भावेश कर्ले(माजी उपसरपंच),सतीश कर्ले(व्य.स.अध्यक्ष ),अरुण कर्ले(माजी व्य.स.अध्यक्ष)किरण कर्ले,रविंद्र सुतार(व्य.स.शिक्षणतज्ञ)अनिता पाटकर (मुख्याध्यापिका)वर्षा आंबेरकर,अर्चिता गुंडये,साक्षी आंबेरकर,श्रीम.पाटील ,शितल कासले व पालक उपस्थित होते.
श्री.विजय घरत यांच्या सहकार्याने व अमित मांजरेकर,भावेश कर्ले,अरूण कर्ले ,अनिकेत जामसंडेकर यांच्या प्रयत्नातून हा संगणक प्रदान करण्यात आला.
शाळा व्यव.समिती अध्यक्ष मा. श्री.सतीश कर्ले व मुख्याध्यापिका श्रीम.अनिता पाटकर यांच्याकडे हा संगणक सुपूर्द करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.संदीप कदम तर आभार श्रीम.अनिता पाटकर यांनी व्यक्त केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण