आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा नोंद करा
शिवसेनेची मागणी ; पोलिसांना दिले निवेदन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य
प्रतिनिधी । कुडाळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या आणि गलीच्छ भाषेत वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा नोंद करुन कार्यवाही करा अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने केली आहे. त्याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी कुडाळ पोलिस निरीक्षक श्रीम रुणाल मुल्ला यांच्याकडे दिले. युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना नेते अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बुधवारी हि मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे कि, आम नितेश राणे यांनी आपली पातळी सोडलेली असुन एकेरी भाषेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दात उल्लेख करत आहेत. या शिवाय डरपोक, खोटारडा, निष्क्रिय अशा शब्दांनी अपमानास्पद बोलुन आम्हा शिवसैनिकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करून चिथावणी खोर वक्तव्यांमुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत. म्हणून पुढील अनर्थ टाळण्यासाठी आम राणें वर गुन्हा नोंद करावा न पेक्षा ज्या शिवसेनेने राजकिय पटलावर राणे कुटुंबीयांना आणुन नाव लौकीक मिळवुन दिले त्याच शिवसेनेचे शिवसैनिक आम राणे यांची उध्दव ठाकरे यांच्या बद्दल करत असलेली वक्तव्य थांबवण्यासाठी इलाज करतील असा इशारा श्री शिरसाट व बंगे यांनी दिला.
यावेळी सोशल मिडिया शिवसेना जिल्हाप्रमुख अनुराग सावंत, कुडाळ ओबिसी सेल शहर प्रमुख राजु गवंडे, युवा सेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, शिवसेना उपशहरप्रमुख गुरु गडकर, नगरसेवक श्रृती वर्दम, नगरसेवक ज्योती जळवी, नगरसेवक श्वेता गवंडे, कुडाळ शहर सोशल मिडिया प्रमुख गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.