कवठी गाडी वेळेत सोडा !

युवासेनेची एसटी कडे मागणी

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कवठी गावात जाणाऱ्या शाळेच्या मुलांच्या एसटी बसेस वेळेत सोडा अशी मागणी शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आली. युवासेनेच्या वतीने आज एसटी अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. कुडाळ आगारातुंन कवठी,हुमरमळा बसेस वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत याकडे अतुल बंगे यांनी लक्ष वेधलं.
यावेळी संजय गांधी निराधारचे माजी अध्यक्ष अतुल बंगे,ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शिवसेना नेरूर जि.प उपविभागप्रमुख मंगेश बांदेकर, कवठी गावचे माजी सरपंच रुपेश वाडीयेकर,विद्यमान उपसरपंच सौ ऋतुजा खडपकर, युवासेना शहरप्रमुख संदिप म्हाडेश्वर, कवठी युवासेना शाखाप्रमुख रुपेश खडपकर,शिवसेना उपशहरप्रमुख गुरू गडकर, युवासेनेचे राजू गवंडे आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!