सुरेश ठाकूर गुरुजींची ‘आचाऱ्याचो पावस’ कविता होतेय व्हायरल

गोव्यातील उमेश फडते यांनी बनविला कवितेचा व्हिडीओ
निलेश जोशी । कुडाळ : नुकताच मॉन्सूनचा पाऊस सुरु झालाय. कोकणातला पाऊस म्हणजे तुफान बरसतो. या पावसाचं वर्णन करायचा मोह शब्दप्रभू मंगेश पाडगावकर, आरती प्रभू अशा दिग्गजांना झाला तसा तो आमच्या आचऱ्याच्या सुरेश ठाकूर गुरुजींना सुद्धा झाला आणि गावरान मलावणी भाषेतली कविता साकारली… आचऱ्याचो पावस !
कोमसापचे मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी कविता सादर करण्यापूर्वी लिहितात, संस्थान आचरे गावची जशी रामनवमी, डाळपस्वारी, गावपळण अनुभवावी; तसाच आचरे संस्थानाचा पाऊस कधीतरी वाडी-वाडीवर जाऊन अनुभवावा. त्याच्या बरसण्यात तुम्हाला सांबसदाशिवाचे दर्शन घडेल! मग येताय ना आच-याचो पावस पाऊस अनुभवक? येवा पाऊस तुमचो! आचराव तुमचाच!
आचऱ्याच्या वाडीवाडीत या पावसाचं रूप कस भासतं याच सुंदर वर्णन सुरेश ठाकूर गुरुजी यांनी या कवितेत केलं आहे. हि कविता अनेक ग्रुपवर त्यांनी पाठवली. गोव्यातल्या खांदेपारचे उमेश फडते यांनी तरी ठाकूर गुरुजींच्या या कवितेचा चक्क व्हिडीओ बनवला. अशी सुंदर कविता, आचऱ्याचो पावस !
‘आचऱ्याचो पावस !’
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता,
ढगांचे फेटे कपाळार बांधता,
पालखेत बसान वाडीवाडीर मिरावता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता….
पिरावाडीक तेचो नाच बघूचो,
पारवाडीर तेचो बाज अनुभवचो,
चायची तपला नदीत ओतीती रवता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता….
हिर्लेवाडीर तेचो झुलवो जोरात रंगता,
कुपेरीच्या डोंगरार सनय वाजयता,
ढोलकीच्या तालार थेंब थेंब पडता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता….
गाऊडवाडीक भंडारवाडीक पाय पसरून बसता,
देवाचो मळो सगळो येंगेर घेता,
डोंगरेवाडीच्या खाजनात लपाछपी खेळता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता…..
डुलना बघूचा तेचा जामडूलवाडीत,
घोरणा आयकाचा तेचा नागोचीवाडीत,
सड्यार कापार तासो वाजवीत येता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता……
रविवारच्या बाजाराक केंडी काडीत रवता,
गुरुवारच्या बाजाराक शेंडीच लावता,
हातातली छत्री कधी लंपास करता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता….
रामेश्वराच्या देवळात वारकरी होता,
मृदुंगाच्या तालार जटेतून झिरापता,
मल्हाराचे सूर पापडेर वाजयता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता….
पावस खय नसता? गावागावात आसता,
वाडीर वाडीर तेचा रुपडा बदालता,
आचऱ्याचो पावस माका संस्थानी वाटता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता..!
--- ठाकूर गुरुजी, आचरे.9421263665
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.