दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कारांचे मंगळवारी वितरण

दहावी बारावीत प्रथम क्रमांक मिळविलेल्यांचाही होणार सन्मान

प्रतिनिधी l दोडामार्ग
दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा व दहावी-बारावीत उज्ज्वल यश मिळवलेल्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान उद्या (ता.२७) सकाळी ११ वाजता येथील सुशिला हाॅलमध्ये होणार आहे.
दोडामार्ग तालुका वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पार पडलेल्या दहावी व बारावीच्या परिक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेले तालुक्यांतील सहा विद्यार्थी व प्रत्येक शाळेत दहावीत प्रथम आलेले सर्व विद्यार्थी तसेच १०० टक्के निकाल लावणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचाही सन्मान यावेळी केला जाणार आहे. दोडामार्ग तालुका पत्रकार समिती आणि उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांच्या श्रीमती सुशिलाबाई चॅरिटेबल मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर उपस्थित राहणार

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तहसीलदार अरुण खानोलकर, पोलिस निरीक्षक अरुण पवार, सहायक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर, वनक्षेत्रपाल अनुप कन्नमवार, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला तालुकावासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष संदीप देसाई, सचिव गणपत डांगी, उपाध्यक्ष साबाजी सावंत व शंकर जाधव, खजिनदार रत्नदीप गवस तसेच श्रीमती सुशीलाबाई मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विवेकानंद नाईक यांनी केले आहे.

पुरस्काराचे मानकरी …..

पत्रकार ओम देसाई, सुनील नांगरे, लक्ष्मण शिरोडकर, गजानन बोंद्रे, तेजस देसाई, ऋषीकेश धर्णे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. ते सर्व पुरस्कार तत्कालिन अध्यक्ष सुहास देसाई यांनी जाहीर केले होते. त्यांचे वितरण उद्या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

error: Content is protected !!