सावंतवाडी तालुक्यात मळगाव रेडकरवाडीत मादी गव्याचा मृत्यू

वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव रेडकरवाडी येथील भातशेतीच्या बांधावर गवा मृतावस्थेत आढळून आला. मादी जातीचा हा गवा रविवारी सकाळी येथील शेतकरी महेश पंत वालावलकर यांच्या निदर्शनास आला. त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्यासह वनपाल विजय पांचाळ, वनरक्षक प्रकाश रणदिवे, बबन रेडकर, पोलीस पाटील रोशनी जाधव आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल वरठी यांना संपर्क साधण्यात आला. डॉ. मृणाल वरठी यांनी घटनास्थळी दाखल होत गव्याचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत गव्यावर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी एल ए मोडक, स्थानिक शेतकरी राजेंद्र रेडकर, मिलींद पंत, विनय पेडणेकर, अनिकेत रेडकर, दिवाकर खानोलकर, दयानंद मातोंडकर, अक्षय रेडकर, प्रतिक हरमलकर, विजय हरमलकर, वेदांत हरमलकर, दिलीप नाईक, सर्वेश कोचरेकर आदींचा शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मात्र, या गव्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अजून निश्चित झालेला नसून शवविच्छेदन अहवालानंतरच ते स्पष्ट होईल अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल वरठी यांनी दिली.

error: Content is protected !!