खारेपाटण मध्ये होणार रिंगरोड….!

बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी मिटणार….

माजी आम.प्रमोद जठार ,कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी केली रिंगरोड जागेसाठी पाहणी

खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असून पंचक्रोशीतील एक प्रसिद्ध बाजरपेठ म्हणून खारेपाटण कडे पाहिले जाते.खारेपाटण बाजारपेठेवर आजूबाजूची अनेक गावे अवलंबून आहेत.खारेपाटण हे ठिकाण जिल्हयाचे प्रवेशद्वार असल्याने अनेक ग्राहक नागरिक खारेपाटण मध्ये येत असतात.खारेपाटण बाजरपेठेमध्ये असणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी ला जास्त प्रमाणात येथे तोंड द्यावे लागत आहे. यासाठी पर्याय म्हणून अनेक वर्षे झाली रिंगरोड ची संकल्पना अमलात आणण्याची गरज आहे अशी मागणी जोर धरू लागली होती.सध्या ची बाजारपेठेच्या वाहतूक कोंडी ची अवस्था बघता रिंगरोड ची गरज अत्यावश्यक असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.हे लक्षात घेऊन आज दि.18 जून रोजी माजी आम.प्रमोद जठार ,कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी रिंगरोड साठी च्या पर्यायी जागेची पाहणी केली तसेच कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी जागेची पाहणी करून सर्व्हे करण्याचेही आदेश दिले.यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस रवी शेट्ये,खारेपाटण येथील राजू वरुणकर ,भाऊ राणे,प्रशांत गाठे,परवेज पटेल,रमेश ढेकणे आदी उपस्थित होते.
या रिंगरोड मुळे वाहनांना अजून एक पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्याने बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी ची समस्या मिटेल आणि जी जड वाहने आहेत त्यांना ही प्रवास करणे सोपे पडणार आहे.एकूणच आपण पाहिलं वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोड उपयोगी येणार आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!