कुडाळात उद्या सिंधुदुर्ग टीचर्स टाॅक फोरमचा स्नेहबंध

एस आर दळवी फाऊंडेशनचे आयोजन
स्नेहबंधचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलाच प्रयोग
प्रतिनिधी । कुडाळ : एस आर दळवी फाऊंडेशन अंतर्गत सिंधुदुर्ग टीचर्स टाॅक फोरमचा स्नेहबंध 2023 स्नेहमेळावा रविवार दि 18 जून रोजी मराठा समाज हाॅल कुडाळ येथे सकाळी 11 ते 2 या वेळात संपन्न होणार असल्याचे सिंधुदुर्ग टीचर्स फोरमचे जिल्हाध्यक्ष सचिन मदने यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
एस आर दळवी फाऊंडेशनची सिंधुदुर्ग टीचर्स टाॅक फोरम शाखेच्या सर्व जिल्हा ,तालुका पदाधिकारी-सदस्य यांचा स्नेहबंध 2023 स्नेहमेळावा जिल्हाध्यक्ष सचिन मदने यांचे अध्यक्षतेखालील पहिल्यांदाच कुडाळ येथील मराठा समाज एसी हाॅलमध्ये रविवार दि 18 जून रोजी सकाळी 11 ते 2 या वेळात आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त रामचंद्र (आबा) दळवी ,सौ सीता रामचंद्र दळवी संस्थापक विश्वस्त व मुख्य संचालक डाॅ नयन भेडा मुंबईवरून उपस्थित राहणार आहेत.फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यरत जिल्हा व तालुका पदाधिकारी-सदस्य यांची एकमेकांशी ओळख व्हावी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने स्नेहबंध कार्यक्रम आयोजित करण्यात आल आहे.
या कार्यक्रमात फाऊंडेशन च्या विविध उपक्रमांची माहिती देणारा माहितीपट दाखविण्यात येणार आहे. फाऊंडेशनचा इतिहास माजी जिल्हाध्यक्ष महेश सावंत सांगणार आहेत. तसेच शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळांमध्ये राबवावयाच्या विविध उपक्रमांचे नियोजन या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील फाऊंडेशनचे काम करण्यासाठी निवडलेल्या नवीन पदाधिकारी-सदस्य यांना या कार्यक्रमात ओळखपत्र व नियुक्तीपत्र वितरण करण्यात येणार आहे.
संस्थापक विश्वस्त श्री रामचंद्र दळवी व सौ सीता दळवी उपस्थित पदाधिकारी-सदस्य यांच्याशी सुसंवाद साधणार आहेत .यावेळी सिंधुदुर्ग टीमचे नियोजनबद्ध चाललेल्या कार्याची माहिती घेण्यासाठी रत्नागिरी टीचर्स टाॅक फोरमचे पदाधिकारी-सदस्य उपस्थित राहणार आहेत. सर्वांना स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा ,तालुका पदाधिकारी-सदस्य यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सचिन मदने ,जिल्हा उपाध्यक्ष चेतन बोडेकर, जिल्हासरचिटणीस विजय गावडे यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.