दिगंबर नाईक यांच्या ‘साकव’ वेब सिरीजची रसिकांना भुरळ

जिल्ह्यातील कलाकारांनी सुद्धा जिंकली रसिकांची मने

दिगंबर नाईक यांची हटके भूमिका

दिगंबर नाईक यांची विनोदी कलाकार म्हणून ओळख आहे. पण या त्यांच्या प्रतिमेला छेद देणारी एक आव्हानात्मक भूमिका असलेली ‘साकव’ हि वेबसिरीज सध्या रसिकांच्या पसंतीस उतरतेय. इट्समज्जा या युट्युब वाहिनीवर दर गुरुवारी हि सिरीज पाहायला मिळते. दिगंबर नाईक यांच्या सोबतच सिंधुदुर्गातील कलाकारांनी सुद्धा यात भूमिका केल्या असून त्यांनी सुद्धा रसिकांची माने जिंकली आहेत.
सिने,नाट्य आणि मालिका क्षेत्रात सध्या मालवणी भाषेला खूप महत्व आहे. त्यामुळे मालवणी चित्रपट, मालिका, नाटके यांच्याकडे अनेक निर्माते वळतात. मालवणी भाषा गोड आणि लोकांना आवडणारी असल्याने या भाषेमध्ये अनेक प्रोजेक्ट्स होऊ लागले आहेत. सिंधुदुर्गात त्यांचे चित्रकारण होऊ लागले आहे. अगदी पश्चिम महाराष्ट्रातील कलाकारांना सुद्धा मालवणी भाषेतही भुरळ पडली आणि एक साकव नावाची वेब सिरीज सिंधुदुर्ग जिल्हयात आकाराला आली.
नितीन पवार हे या ‘साकव’ मालिकेचे लेखक, पटकथाकार आणि संवाद लेखक असून नितीन वडेवाले हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत, तसेच पटकथा शुद्ध त्यांची आहे. सौरिंद्रनाथ दत्त आणि मीडिया व सोल्युशन यांनी या वेब सिरींजची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध कलाकार आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र दिगंबर नाईक यांची एक नेहमीपेक्षा वेगळी भूमिका या वेब सिरीज मध्ये पाहायला मिळते. एसटी महामंडाळात वाहकाची नोकरी करणारा आणि आपला मुलगा मोठा सरकारी अधिकारी व्हावा म्हणून धडपडणारा ‘बाप’ दिगंबर नाईक यांनी फार सुंदर प्रकारे साकारला आहे.
दिगंबर नाईक यांच्या सोबतच कोकणचीच सुकन्या अस्मिता खटखटे यात दिगंबर नाईक यांच्या पत्नीची भूमिका साकारतेय. तर त्यांच्या ‘बंड्या’ या मुलाची भूमिका श्रेयस काटकर याने साकारलीय. त्याच बरोबर संजिता गिरप, तन्वी धुरी, रोशन चव्हाण, सत्यवान गावकर, गौरव राऊळ, चंद्रहास राऊळ, वनिता शिंदे, अभय नेवगी, संतोष रेडकर, निकेत हळवे, सिद्धी परब, तन्मय राऊत, सुधीर धुमे, निलेश उर्फ बंड्या जोशी, हेमाश्री घाटे, हर्षल जाधव, सोहम कुडाळकर, अजित मांजरेकर, सुहास नाईक, बाळ पुराणिक, मुकुंद नाईक, गजेंद्र कोठावळे, प्रवीण सावंत अशा अनेक स्थानिक कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत.
अंकिता लोखंडे या मालिकेच्या क्रिएटिव्ह हेड आहेत तर वरुण जोशी असोसिएट डिरेक्टर आहेत. मंदार पाटील यांच सुंदर पार्श्वसंगीत हि मालिका अधिक सुंदर बनवते. यश भगरे हे या मालिकेचे डीओपी आहेत. सध्या हि मालिका अनेक घरात आवर्जून बघितली जात आहे. अनेकांना या मालिकेच्या कथानकात आपले प्रतिबिंब दिसते यावरून हि मालिका रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचली असल्याचे जाणवते.

error: Content is protected !!