कुडाळ जिल्हा ग्रंथालयात नव्या पुस्तकांचे प्रदर्शन

अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे निमित्त

महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केल्याच्या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’, तर ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.
या सप्ताहाचे औचित्य साधून रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ यांच्या वतीने ग्रंथालयाने खरेदी केलेल्या नवीन पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे होणार आहे. विविध विषयांवरील नव्या पुस्तकांची ओळख वाचकांना या प्रदर्शनातून करून घेता येणार आहे.
वाचनाची आवड असलेल्या नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!