नवी मुंबईहून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि अगात्तीसाठी ‘फ्लाय९१’ची विमानसेवा सुरू

फ्लाय91 चे पाहिले विमान नवी मुंबई विमानतळावर दाखल

विमनाच्या पूर्ण संचलनात महिलांचा सहभाग

गोवास्थित प्रादेशिक विमान कंपनी फ्लाय९१ने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि लक्षद्वीपमधील अगात्ती या ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू केली आहे. हिवाळी वेळापत्रकाचा भाग म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली असून, ५ ऑक्टोबर रोजी फ्लाय९१च्या विमानाचे नवी मुंबई विमानतळावर पहिले लँडिंग झाले. विशेष म्हणजे, या पहिल्या उड्डाणाचे संचालन संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांनी केले. विमानतळावर या विमानाचे ‘वॉटर कॅनन सॅल्युट’ देऊन स्वागत करण्यात आले.
फ्लाय९१च्या नव्या सेवेमुळे नवी मुंबई विमानतळावरून महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टी आणि लक्षद्वीपमधील महत्त्वाच्या पर्यटन व व्यावसायिक केंद्रांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पर्यटन, व्यापार तसेच प्रादेशिक प्रवासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
नवी मुंबई हे फ्लाय९१च्या नेटवर्कमधील १४वे देशांतर्गत आणि महाराष्ट्रातील पाचवे गंतव्यस्थान ठरले आहे. कंपनीच्या नेटवर्कमध्ये गोवा, सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, अगात्ती, कोची, हुबळी, राजमुंद्री, विजयवाडा, तिरुपती आणि नवी मुंबई या १४ शहरांचा समावेश झाला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीएओ सुभाष मुरिकेंचेरी म्हणाले, “फ्लाय९१चे आगमन हे विमानतळाच्या वाढत्या एअरलाइन नेटवर्कमधील महत्त्वाची भर आहे. सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि अगात्ती ही ठिकाणे पर्यटन तसेच प्रादेशिक व्यावसायिक प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. नवी मुंबईला प्रवाशांसाठी सोयीचे प्रवेशद्वार बनविण्यासाठी आणि अर्थपूर्ण कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.”
फ्लाय९१चे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मनोज चाको यांनी सांगितले की, “आर्थिक राजधानीचे प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबईत फ्लाय९१चे पहिले विमान उतरले. अडीच वर्षांपूर्वी दोन विमाने आणि तीन शहरांपासून सुरू झालेला प्रवास आज १४ शहरांमध्ये आठवड्याला ३५०हून अधिक उड्डाणांपर्यंत पोहोचला आहे. नवी मुंबई हे आमच्या नेटवर्कमधील महत्त्वाचे स्थानक असून, येथून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि अगात्तीला सेवा दिली जाणार आहे.”
विमान कंपनीने विस्ताराच्या दृष्टीने ४० एटीआर ७२-६०० विमानांची सुमारे एक अब्ज अमेरिकन डॉलरची निश्चित ऑर्डर दिली आहे. २०२७ ते २०३२ या कालावधीत ही विमाने ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा असून, त्यामुळे कंपनीचा ताफा सध्याच्या सहा विमानांवरून ६० विमानांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, २५ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिक सेवा सुरू झाल्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने ३२ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे. सुरुवातीला १३ ठिकाणांशी जोडलेल्या या विमानतळावरून आता देशातील सुमारे ४३ ठिकाणांसाठी विमानसेवा उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत विमानतळाने २५ हजार २९५हून अधिक व्यावसायिक विमानांचे संचालन यशस्वीपणे हाताळले आहे.
फ्लाय९१च्या नवी मुंबईतील सेवेमुळे विशेषतः सिंधुदुर्गसाठी मुंबई महानगर प्रदेशातून थेट हवाई संपर्क अधिक मजबूत झाला असून, कोकणातील पर्यटन, उद्योग आणि स्थानिक प्रवासाला याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

फ्लाय91 चे पाहिले विमान नवी मुंबई विमानतळावर दाखल

विमनाच्या पूर्ण संचलनात महिलांचा सहभाग

कुडाळ : गोवास्थित प्रादेशिक विमान कंपनी फ्लाय९१ने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि लक्षद्वीपमधील अगात्ती या ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू केली आहे. हिवाळी वेळापत्रकाचा भाग म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली असून, ५ ऑक्टोबर रोजी फ्लाय९१च्या विमानाचे नवी मुंबई विमानतळावर पहिले लँडिंग झाले. विशेष म्हणजे, या पहिल्या उड्डाणाचे संचालन संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांनी केले. विमानतळावर या विमानाचे ‘वॉटर कॅनन सॅल्युट’ देऊन स्वागत करण्यात आले.
फ्लाय९१च्या नव्या सेवेमुळे नवी मुंबई विमानतळावरून महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टी आणि लक्षद्वीपमधील महत्त्वाच्या पर्यटन व व्यावसायिक केंद्रांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पर्यटन, व्यापार तसेच प्रादेशिक प्रवासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
नवी मुंबई हे फ्लाय९१च्या नेटवर्कमधील १४वे देशांतर्गत आणि महाराष्ट्रातील पाचवे गंतव्यस्थान ठरले आहे. कंपनीच्या नेटवर्कमध्ये गोवा, सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, अगात्ती, कोची, हुबळी, राजमुंद्री, विजयवाडा, तिरुपती आणि नवी मुंबई या १४ शहरांचा समावेश झाला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीएओ सुभाष मुरिकेंचेरी म्हणाले, “फ्लाय९१चे आगमन हे विमानतळाच्या वाढत्या एअरलाइन नेटवर्कमधील महत्त्वाची भर आहे. सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि अगात्ती ही ठिकाणे पर्यटन तसेच प्रादेशिक व्यावसायिक प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. नवी मुंबईला प्रवाशांसाठी सोयीचे प्रवेशद्वार बनविण्यासाठी आणि अर्थपूर्ण कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.”
फ्लाय९१चे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मनोज चाको यांनी सांगितले की, “आर्थिक राजधानीचे प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबईत फ्लाय९१चे पहिले विमान उतरले. अडीच वर्षांपूर्वी दोन विमाने आणि तीन शहरांपासून सुरू झालेला प्रवास आज १४ शहरांमध्ये आठवड्याला ३५०हून अधिक उड्डाणांपर्यंत पोहोचला आहे. नवी मुंबई हे आमच्या नेटवर्कमधील महत्त्वाचे स्थानक असून, येथून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि अगात्तीला सेवा दिली जाणार आहे.”
विमान कंपनीने विस्ताराच्या दृष्टीने ४० एटीआर ७२-६०० विमानांची सुमारे एक अब्ज अमेरिकन डॉलरची निश्चित ऑर्डर दिली आहे. २०२७ ते २०३२ या कालावधीत ही विमाने ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा असून, त्यामुळे कंपनीचा ताफा सध्याच्या सहा विमानांवरून ६० विमानांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, २५ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिक सेवा सुरू झाल्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने ३२ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे. सुरुवातीला १३ ठिकाणांशी जोडलेल्या या विमानतळावरून आता देशातील सुमारे ४३ ठिकाणांसाठी विमानसेवा उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत विमानतळाने २५ हजार २९५हून अधिक व्यावसायिक विमानांचे संचालन यशस्वीपणे हाताळले आहे.
फ्लाय९१च्या नवी मुंबईतील सेवेमुळे विशेषतः सिंधुदुर्गसाठी मुंबई महानगर प्रदेशातून थेट हवाई संपर्क अधिक मजबूत झाला असून, कोकणातील पर्यटन, उद्योग आणि स्थानिक प्रवासाला याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

error: Content is protected !!