सार्वजनिक नळ सुरु दिसल्यास किंवा पाणी वाया जाताना आढळल्यास थेट नगरपंचायतला कळवा

पाणी बचती करिता कणकवली नगरपंचायत ॲक्शन मोडवर
पाणी चोरी, अनधिकृत नळ कनेक्शन दिसल्यास संपर्क साधा
कणकवली नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या प्रशासनाकडून शहरवासी यांना आवाहन
अल निनो व आयओडी च्या प्रभावाने पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये याकरिता आपल्या प्रभागात किंवा नगरपंचायतीच्या मुख्य वाहिनीवर कुठे लिकेज असल्यास किंवा पाण्याचा कुठे गैरवापर होताना दिसल्यास नगरपंचायत प्रशासनास त्वरित माहिती देण्यात यावी. तसेच आपले स्वत:चे नळ कनेक्शन लिकेज असल्यास दुरुस्ती करून घेण्यात यावे. ना-दुरुस्त नळ दुरुस्त करून घेण्यात यावे. नागरिकांनी प्रत्येकाने जपून पाण्याचा वापर करण्यात यावा. व पाण्याचा अपव्यय टाळावा. जेणेकरून भविष्यात पाणी टंचाई होणार नाही व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. असे आवाहन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर व मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह प्रशासनाने शहरवासीयांना केले आहे.
कणकवलीला पाणी टंचाईमुक्त आणि समृद्ध ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग मोलाचा आहे. चला, आजच संकल्प करूया – “पाणी वाचवूया भविष्य घडवूया”
तरी पाणी वाचवून नागरिकांनी कणकवली नगरपंचायतीस सहकार्य करावे. याकरिता संपर्क साधण्यासाठी
संपर्क – श्री.प्रशांत पिळणकर, मो.9420306203
नगरपंचायत हेल्पलाईन क्रमांक – 02367-232007
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
- नळ सुरु ठेऊन पाण्याचा अपव्यय करू नका.
- घरगुती नळ, टाकी व पाईप लाईनमधील गळती तत्काळ दुरुस्त करा.
- पाणी आवश्यक तेवढेच वापरा.
- वाहन, अंगण, रस्ते इत्यादी धुण्यासाठी पाण्याचा वापर टाळावा. तसेच बांधकामावर मारण्यात येणा-या पाण्याचा वापर टाळावा.
- सार्वजनिक ठिकाणी नळ सुरू राहिलेला किंवा पाणी वाया जाताना दिसल्यास नगरपंचायतीला कळवा.
- पाण्याचा साठा काळजीपूर्वक व नियोजनपूर्वक वापरा
- पाणी चोरी, अनधिकृत जोडणी किंवा पाण्याचा गैरवापर आढळल्यास नगरपंचायतीस माहिती द्या.






