कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर

शहरवासीयांना या प्रश्नाबाबत सहन करावा लागतो त्रास

नगरपंचायत या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार

नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न

कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गेले काही दिवस पुन्हा एकदा ऐरणी वर आला असून, कणकवली शहरात अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गेले काही दिवस कणकवली नगरपंचायत मार्फत कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची मोहीम राबवली गेली होती. मात्र ती मोहीम ही सध्या बंद झाली असून शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना नगरपंचायतचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कणकवली शहरात दोन दिवसांपूर्वीच कणकवली कॉलेज च्या परिसरात मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या काही नागरिकांनी या भटक्या कुत्र्यांच्या संख्येची वस्तुस्थिती दर्शवणारे एक व्हिडिओ शूटिंग केले असून हे व्हिडिओ शूटिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये या विद्यानगर भागामध्येच सकाळी माणसांपेक्षा कुत्र्यांची संख्या रस्त्यावर जास्त असल्याची दिसून येत असल्याचे उपहासात्मक बोलले जात आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना देखील या इतक्या कुत्र्यांच्या त्रासाला घाबरून अन्य मार्गाचा वापर करायचा का असा सवाल उपस्थित केला आहे. कणकवली नगरपंचायतने या गंभीर प्रश्नाकडे डोळे झाक न करता नगरपंचायत कडून तात्काळ उपायोजना करण्यात यावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

error: Content is protected !!