आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या कु.आराध्या गोडवे चे विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण यश.

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेचा इयत्ता नववीचा विद्यार्थी कु.आराध्य अवधूत गोडवे याने विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेत झेप घेतली आहे आराध्याच्या अचूक आणि कौशल्यपूर्ण खेळाने त्याने हे नेत्रदीपक यश मिळवले आहे आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
त्याच्या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे, सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम, सल्लागार श्री. डी. पी. तानावडे, मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे, तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.






