कणकवली शहरात बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

बँक सुरक्षा एजन्सी व कणकवली पोलिसांनी दाखवली सतर्कता
पोलीस येण्याआधीच चोरटा पसार
कणकवली शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम अज्ञात चोरट्याकडून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बँकेच्या सुरक्षा यंत्रणा व कणकवली पोलिसांच्या मदतीने हा प्रयत्न अयशस्वी झाला. ही घटना सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सोमवारी पहाटे चोरट्याने बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या एटीएम च्या सुरक्षा यंत्रणेचे कनेक्शन नोएडा या ठिकाणी असते. त्या सुरक्षा यंत्रणेला मेसेज गेल्यावर त्यांनी तातडीने कणकवली पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी ड्युटीवर असलेल्या कणकवली पोलिसांनी तात्काळ या एटीएमच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र तोपर्यंत चोरटा येथून पसार झाला.
दिगंबर वालावलकर कणकवली






