सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात आर्ट ऑफ लिव्हिंग (कणकवली) परिवारातर्फे वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग-कणकवली परिवाराच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह वर्ग 1 परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. कारागृह परिसर अधिक हिरवागार करण्यासह पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवली परिवाराचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर, कारागृह अधिक्षक सतीश कांबळे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी भाऊसाहेब आगवणे, एम.एम.कन्हेपाड, ॲड. गायत्री मालवणकर, निलेश जोशी, भगवान लोके, योगेश मुळे, नंदकुमार आरोलकर, पंढरीनाथ गुरव, सुनील बाणे, प्रभाकर बाणे, कविता जोशी, अनुप्रिया रेगे, कारागृह हवालदार अर्जुन घोडके, समाधान पाटील, महिला काँस्टेबल ऋतुजा पाटील आदींसह आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक तसेच जिल्हा कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
वृक्षारोपणानंतर लावलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाचे वाढते महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कारागृह अधिकारी सतीश कांबळे यांनी कौतुक केले. यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा मानस आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने व्यक्त केला. वृक्षारोपणामुळे जिल्हा कारागृह परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित होण्यास निश्चित मदत होणार आहे.

error: Content is protected !!