बेकायदा बंदूक निर्मिती प्रकरणी अजून एकाला अटक

प्रकारणातील सहाही संशयितांना न्यायालयीन कोठडी

तालुक्यातील निरुखे – सुतारवाडी येथील बेकायदा बंदूक निर्मिती प्रकरणी कुडाळ पोलिस अधिक तपास करीत असताना मुख्य संशयिताकडून मिळालेल्या माहितीनुसार व घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालानुसार पंढरीनाथ चंद्रकांत लाड (रा भडगांव खुर्द) या आणखीन एका संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसाना यश आले. आज सर्व सहाही जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता सर्वांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. लाड याच्याकडे एक बंदूक सापडली. ती जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या बंदुकांची एकूण संख्या सात झाली आहे. दरम्यान काल ताब्यात घेतलेल्या व पूर्वीच्या मिळून सहा संशयितांना गुरुवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यांची ओरस येथील जेल मध्ये २वानगी करण्यात येणार आहे.
कुडाळ तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी रात्री छापा टाकला होता. या कारवाईत ३ तयार बंदुका, ६ बॅरल आणि बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित जगन्नाथ शंकर मेस्त्री (६५, रा. निरुखे – सुतारवाडी) याला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास कुडाळ पोलीस करीत असून संशयित जगन्नाथ मेस्त्री याला मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. मेस्त्री याच्याकडे कुडाळ पोलिसांनी चौकशी केल्यानंतर यामध्ये अजून चार जणांची नावे समोर आली. यामध्ये दयानंद सोनू कदम (33, रा असरोंडी ), आग्नेल मार्शल डिसोझा (32, रा भडगांव बुद्रुक ), योगेश राजेंद्र तावडे (28, रा ओरोस) व सिद्धेश चंद्रकांत मराठे (29,रा कडावल ) या चार जणांना मंगळवारी रात्री उशीरा ताब्यात घेत अटक केली.
यामध्ये आग्नेल डिसोजा याच्याकडे एक बंदूक व 10 काडतुसे, तर सिद्धेश मराठे याच्याकडे दोन बंदुका, गन पावडर व शरे असे साहित्य सापडले. मेस्त्री याच्याकडे मिळालेल्या तीन बंदुकांपैकी दोन बंदुका या दुरुस्तीसाठी आल्या होत्या. त्या योगेश तावडे व दयानंद कदम या दोघांच्या असल्याचे निष्पन्न झाले. मेस्त्री याच्याकडे बंदुका दुरुस्तीचा परवाना आहे. मात्र, दुरुस्तीसाठी आलेल्या या दोन बंदुकाधारकांकडे बंदुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी योगेश तावडे व दयानंद कदम या दोघांना याप्रकरणी ताब्यात घेत अटक केली होती. दरम्यान, पोलिसांनी पंढरीनाथ लाड या संशयिताला ताब्यात घेतले असून चौकशी केली असता एक बंदुक सापडून आली. आज सर्वांना न्यायालयाने न्यायालयीन कस्टडी दिली. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुरुदास पाडावे करीत आहेत.

error: Content is protected !!