बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये वसुबारसचा भक्तिमय सोहळा

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये वसुबारसचा सण पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रशालेच्या गोठ्यात पाळण्यात येणाऱ्या गायी व वासरांची विधिवत पूजा करून गोमातेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमात इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. गाय-वासरांना आंजारण्याची, गोंजारण्याची संधी मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रशालेच्या प्राचार्या सौ. चैताली बांदेकर यांच्या हस्ते गायी व वासरांना पुष्पहार अर्पण करून पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनीही गोवंशाचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर गायी-वासरांना महाप्रसाद अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी सौ. चित्रा कुंटे, सौ. अश्विनी परब, सौ. पूर्णिमा शिरवलकर, सौ. रूपश्री आळवे यांच्यासह शिक्षकवृंद आणि गायींची देखभाल करणारे पडते काका उपस्थित होते.

error: Content is protected !!