विभागस्तरीयश स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे चे नेत्र दीपक यश.

कणकवली/मयूर ठाकूर
आमराई ऑफिसर्स क्लब सांगली या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या विभागस्त्रीय स्पर्धेमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेच्या विदयार्थ्यांनी नेत्र दीपक यश प्राप्त केले आहे
या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात सारा राजू शिंगाडे आणि फातिमा दाऊद शेख (इयत्ता दहावी ) या विद्यार्थिनींनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच 17 व 19 वर्षाखालील मुलांच्या गटात वैभव वरक व जैनुल शहा आणि यज्ञेश तेली( इयत्ता दहावी) यांनीही सेमी फायनल पर्यंत धडक मारली या स्पर्धेसाठी त्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक योगेश सामंत सर, वासुदेव दळवी सर, आणि जिष्णा नायर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्व मुलांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम,सल्लागार डी. पी. तानावडे सर,आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गांमधून अभिनंदन केले जात आहे






