आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न.

कणकवली/प्रतिनिधी
कणकवली तालुका विधी सेवा समितीच्या वतीने ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेत कायदेविषयक मार्गदर्शन नुकतेच संपन्न झाले.
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात आणि परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेले विविध अत्याचार या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पोक्सो कायदा याविषयी मार्गदर्शन करण्यात आला त्याचप्रमाणे सायबर क्राईम पासून विद्यार्थ्यांनी कसं दूर व्हायला पाहिजे या संदर्भातही मार्गदर्शन या प्रसंगी करण्यात आले.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी कणकवली न्यायालयाच्या वकील .पद्मश्री वाळके/ मांद्रे, वकील आदित्य वर्दम,वरिष्ठ लिपिक मुग्धा आचार्य,कणकवली पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल सुशांत कोलते, आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम या सर्वांचे प्रशालेचे कॉर्डिनेटर निलेश घेवारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रशाला शिक्षक हेमंत पाटकर सर यांनी मानले.






