आचरा येथील ब्राह्मणदेव मंदिराचा वर्धापन दिन ३ मे रोजी

आचरे गाऊडवाडी येथील ब्राह्मणदेव मंदिराचा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. ३ मे रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या निमित्त सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने, ७ वाजता ५१००० दीप प्रज्वलित करण्याचा संकल्प आहे. इच्छुक भाविकांनी या पुण्यकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी खालील अमित गांवकर- ९३५९८९८३९३ यांच्या शी संपर्क साधावा., रात्री ८ वाजता मान्यवर व गुणवंतांचा सत्कार, रात्रौ ९.३० वाजता खुली ‘समूह नृत्य स्पर्धा” या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे २०,०००, १५,००० व १०,००० रुपये व प्रत्येकी चषक तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.या साठी 9421574700,9404457835 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन श्री ब्राह्मणदेव गाउडवाडी मित्र मंडळ आचरा तर्फे करण्यात आले आहे.





