दिवाळी निमित्त सुगंधित उटणे आणि पणत्या तयार करून त्या विविध संस्थांना वाटप करत आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुलांनी जपली सामाजिक बांधिलकी.

कणकवली/मयूर ठाकूर

आजचा विद्यार्थी हा उद्याचा भाविक नागरिक आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच उद्याच्या भावी नागरिकांचे कर्तव्य म्हणजेच सामाजिक बांधिलकी जपणं आणि अशाच प्रकारच्या सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेमध्ये केला जातो. या प्रशालेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील शिक्षणासोबतच इतरही विविध कौशल्याचे शिक्षण दिलं जातं याचाच एक भाग म्हणून यावर्षी इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः पणत्या आणि सुगंधित उटणे बनवून ते कणकवली शहरातील विविध संस्थांना स्वतः या मुलांनी जाऊन या उटणे आणि पणत्यांचे वाटप केलं यामध्ये कणकवली पोलीस ठाणे, मर्गज प्रिंटिंग प्रेस, तरुण भारत वृत्तपत्र कार्यालय, पुढारी वृत्तपत्र कार्यालय, प्रहार व लोकमत पेपर कार्यालय,स्वरूप प्रिंटर्स कणकवली, पोस्ट ऑफिस कणकवली,पोरे स्टील सेंटर, हर अँड हायनेस कापड दुकान, विकास जनरल स्टोअर्स ग्रामपंचायत वरवडे, पंचायत समिती कणकवली, इत्यादी संस्थान मधून मुलांनी या पणत्याने उटण्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीतला आपला खारीचा वाटा जपत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमासाठी इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गांचे वर्गशिक्षक तसेच सौ.परिमला गोडावे मॅडम,श्रेया कसवणकर मॅडम,रजनी चव्हाण मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!