श्रमजीवी संघटनेचे वसई प्रांत कार्यालयावरील बेमुदत सत्याग्रह आंदोलन स्थगीत

मागण्या पुर्ततेचे प्रांत कार्यालयाकडून संघटनेला मिळाले लेखी आश्वासन
आंदोलना दरम्यान तात्काळ देण्यात आले ३०८ जात दाखले
वसई प्रांत कार्यालयावर सुरू असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या बेमुदत सत्याग्रह आंदोलनात आंदोलनकर्त्यांना मागण्यांच्या पुर्ततेचे लेखी आश्वासन प्रांत कार्यालयाकडून मिळाले. तसेच आंदोलना दरम्यान तात्काळ 308 जातीचे दाखले देण्यात आले.
संघटनेच्या निवेदनातील वन जमीन हक्क मंजूर करून वनहक्क धारकांना पट्टे देणे, घरातील जागा नियमानुकूल करणे,बेकायदेशीर क्रेशर मशीन व खदान तात्काळ बंद करणे व टोकरे खैरेपाडा येथील अनधिकृत बांधकामे करणा-या बिल्डरांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्रांत साहेब व तहसीलदार मॅडम यांनी लेखी स्वरूपात संघटनेला दिल्याने श्रमजीवी संघटनेचे आंदोलन स्थगीत करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे वसई तालुका सचिव एकनाथ कलिंगडा यांनी दिली आहे.
सत्याग्रह ठिकाणी उपस्थीत असलेले श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, उपाध्यक्ष केशवभाऊ नानकर, कार्याध्यक्ष स्नेहा (सोनुताई) दुबे पंडित, जनरल सेक्रेटरी विजयभाऊ जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष माननीय सुरेश भाऊ रेंजड, जिल्हा सचिव व पालघर जि.प.सदस्य गणेशभाऊ उंबरसडा , तालुका पदाधिकारी , झोन पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते , गाव कमिट्यांचे सभासद या सर्वांचे वसई तालुक्याचे वतीने आभार मानण्यात आले. आंदोलनातील मागण्यांवरील यशस्वीतेबद्दल सहभागी आंदोलन कर्त्यांचे अभिनंदन करून आंदोलन स्थगीत करण्यात आले.
किसन चौरे,कोकण नाऊ