माजी गृह राज्यमंत्रीसतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदाश्रय आश्रम अणाव येथे शिधावाटप

राष्ट्रीय काँग्रेस-कुडाळ आणि नगराध्यक्षा आफरीन अब्बास करोल यांच्या माध्यमातून वाटप

कुडाळ : माजी गृह राज्यमंत्री, कोल्हापूर जिल्हा माजी पालकमंत्री, विधान परिषद राष्ट्रीय काँग्रेस गटनेते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस कुडाळ आणि नगराध्यक्षा आफरीन अब्बास करोल यांच्या माध्यमातून आनंदाश्रय आश्रम अणाव येथे शिधा वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा आफरीन अब्बास करोल तसेच महिला व बालकल्याण सभापती अक्षता खटावकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, उपजिल्हाध्यक्ष विजय प्रभू, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तबरेज शेख, चिन्मय बांदेकर, वैभव आजगावकर, तौसीफ शेख, रोहन काणेकर इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!