आचऱा समुद्रात ऑलिव्ह रिडले कासवांच्या 154 पिल्लांना समुद्रात सोडल

गतवर्षी 11 तर यावर्षी 14 कसवांची घरटी करण्यात आलीय तयार

आचरा समुद्र किनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी कासव मित्र सुर्यकांत आबा धुरी यांच्या मार्गदर्शन नुसार गणेश दयाळ धुरी यांनी सवर्धन केलेल्या अंड्या मधून 154 जन्मलेल्या कासव पिल्लांना सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते समुद्री अधिवासात सोडण्यात आले आले. आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होत असून

यावेळी ग्रामविकास अधिकारी पी जी कदम, ग्रा.कर्मचारी सुशिला पांगे, गिरिधर आपकर, पोलिस पाटील विठ्ठल धुरी, कासव सवर्धक शितल जयंत धुरी , सृष्टी सुर्यकांत धुरी, पराग कुबल, महादेव जोशी आदी ग्रामस्थ तसेच किनाऱ्यावर दाखल असलेले पर्यटक यावेळी उपस्थित होते

सुर्यकांत आबा धुरी यांनी  सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करत बुधवारी ५१ दिवसानी त्या अंड्यांपसोडले बाहेर पडलेल्या 154 पिल्लांची  बॅच आचरा सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते समुद्रात सोडली आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती या वर्षाच्या सुरुवाती पासून कासव संवर्धनास वेग आला असून तब्ब्ल 14 घरटी आचरा किनाऱ्यावर तयार करण्यात आली आहेत यातील सात बॅच टप्प्या टप्प्याने सोडण्यात आल्या आहेत. ही कसवाची अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वीपासून समुद्र किनारी संरक्षित करण्याचे काम कासव मित्रानी हाती घेतले आहे. आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होत असून या किनाऱ्यांना पसंती देत आहेत.
अॕलिव्ह  रिडले ह्या कासव जमातीची कासवे या किनाऱ्यास पसंती देताना दिसत आहेत. तळाशील ते आचरा  कासवांच्या अंडी घालण्याचा किनारा म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जाऊ लागला आहे. या भागातील ग्रामस्थ ही अंडी सुरक्षित ठेऊन अन्य हिंस्त्र प्राण्यां पासून त्यांचे जतन करत आहेत. दोन महिन्यानंतर पिल्ले बाहेर पडली की वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात सोडत आहेत.

आचरा / अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!