कुडाळमध्ये रहदारीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई
कुडाळ : कुडाळ शहरात नेहमीच वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत असतो. यावर उपाययोजना राबविण्यासाठी कुडाळ नगरपंचायत आणि वाहतूक पोलीस यांच्याकडून प्रयत्न केले जातात. परंतु, कुडाळ शहरातील वाहतुकीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आता कुडाळ गांधी चौक येथून कुडाळ बाजारपेठेत जाणारा मार्ग हा वन – वे म्हणजे एकदिशा मार्ग करण्यात आलाय. याबाबत कुडाळ नगरपंचायतने वन – वे म्हणजे एकदिशा मार्ग असा फलक गांधी चौक येथे लिहिला आहे. आजपासून कुडाळ बाजारपेठेत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर कुडाळ वाहतूक पोलीस आणि जिल्हा वाहतूक पोलीस यांच्याकडून दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे.
कुडाळ वाहतूक पोलिस श्याम भगत आणि जिल्हा वाहतूक पोलीस मयूर सावंत, विलास नर यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ