घोडावत विद्यापीठातर्फे ‘डिझाईन’ विषयावर मोफत व्याख्यान
बॉलीवूड फॅशन डिझायनर संदेश नवलखा करणार मार्गदर्शन
जयसिंगपूर: संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिझाईन विभागाच्या वतीने 12 वी नंतर डिझाईन विषयात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बॉलीवूड मधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर व स्टायलिस्ट संदेश नवलखा हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
डिझाईन विद्या शाखेतील करिअरच्या संधी या विषया अंतर्गत प्रॉडक्ट डिझाईन, फॅशन डिझाईन, ग्राफिक्स डिझाईन, इंटरियर डिझाईन विषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे. येत्या शनिवारी फॉर्च्यून प्लाझा इचलकरंजी येथे सकाळी 10 ते 1 वा. तर दुपारी 4 ते 7 या वेळेत रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर व रविवारी हॉटेल ककुन सांगली येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://shorturl.at/cfrAC या लिंक वर रजिस्ट्रेशन करावे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यां, पालकांनी या व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन घोडावत विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. आहे. संपर्क:9011039800/9011022567
सध्याच्या काळात डिझाईन हा विषय सर्वत्र चर्चिला जातो परंतु या विषयातील करिअरच्या संधीबाबत विद्यार्थ्यांना जास्त माहिती नाही. या विषयात 12 वी नंतर करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
डॉ.व्ही.व्ही कुलकर्णी, प्राचार्य स्कूल ऑफ डिझाईन एस जी यु