आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नांदगाव उर्दू शाळेत बेंचेस वितरण
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे सर्व प्राथमिक शाळामधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आम. नितेश राणेंच्या मार्फत नांदगाव तिठा येथील उर्दू शाळा येथे बँचेसही प्रदान करण्यात आले आहे.
आम. नितेश राणेंच्या नांदगाव येथील दौऱ्यावेळी उर्दू शाळा येथे आकस्मिक भेट दिली होती.यावेळी आ.नितेश राणे यांच्या येथील मुलांसाठी बँचेस गैरसोय लक्षात आली होती. काही दिवसांत बँचेस दिल्या जातील असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त करून येथील प्रशालेत बँचेस प्रदान करण्यात आले आहे. उर्दू शाळेला बँचेस प्रदान करण्यात आल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर ,उपसरपंच इरफान साटविलकर, भाजपचे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, महीला तालूकाध्यक्षा हर्षदा वाळके, अहमद बटवाले,माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर , माजी उपसरपंच निरज मोरये , सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संतोष जाधव, राजू खोत, राजू तांबे, मारुती मोरये, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, अक्षता खोत, अनिकेत तांबे,नमिता मोरये,रमिजान बटवाले, रज्जाक बटवाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अल्लाउद्दीन बोबडे,जाफर कुणकेरकर,शाळा मुख्याध्यापक मुंगी, शाळेतील शिक्षक वृंद आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कणकवली / प्रतिनिधी