सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरडीसी पदी मच्छिंद्र सुकटे यांची नियुक्ती

तत्कालीन आरडीसी दत्तात्रय भडकवाड यांच्या बदलीनंतर होता अतिरिक्त कार्यभार

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी च्या रिक्त पदावर बीड येथील विशेष भूसंपादन अधिकारी (लपा) चे मच्छिंद्र सुकटे यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली. या पदावर दत्तात्रय भडकवाड यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. सध्या अविनाशकुमार सोनोणे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार असून मच्छिंद्र सुकटे हे यापूर्वी विशेष भूसंपादन अधिकारी लघु पाटबंधारे बीड येथे कार्यरत होते. गेल्या अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आरडीसी या पदावर मच्छिंद्र सुकटे यांची नियुक्ती झाली आहे.

दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग

error: Content is protected !!