राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन

राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात देण्यात आले निवेदन

राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.वडूज, सातारा येथे श्री. दादासाहेब(आण्णा) गोडसे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त अजितदादा वडूज येथे आले होते. सदर निवेदनात राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणे दोन जादा वेतनवाढी,ऑनलाइन बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक मध्ये समावेश, कायमस्वरूपी ओळखपत्र, जिल्हा परिषद आणि शासनाच्या विविध समित्यावर राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे (सिंधुदुर्ग),राज्य प्रवक्ता सुनील गुरव (सांगली), राज्य प्रसिद्ध प्रमुख डॉ. संजय जगताप (कोल्हापूर), पुणे विभागीय अध्यक्ष सतीश चिपरीकर (कोल्हापूर), सातारा जिल्हाध्यक्ष प्रशांत राऊत यांचा समावेश होता. दादांनी सदर मागण्यासाठी आपली मुंबईला खास भेट घ्यावी असे आश्वासन संघटना शिष्टमंडळाला दिले. त्याचवेळी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रश्नांची निवेदने श्रीनिवास पाटील खासदार सातारा लोकसभा मतदारसंघ तथा माजी राज्यपाल सिक्कीम ,शशिकांत शिंदे आमदार तथा माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य ,मकरंद पाटील आमदार वाई मतदार संघ ,अरुण अण्णा लाड पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ यांना सुद्धा निवेदने देण्यात आली आहेत .

अस्मिता गिडाळे / खारेपाटण

error: Content is protected !!